बुलडाणा, दि. 24
: निवडणूक आचारसंहिता बुलडाणा जिल्ह्यात
लागू असून अनधिकृत पैसे वाटप टाळण्यासाठी जागो जागी दक्षता पथके बसविण्यात आली
आहे. सर्व जनतेस रोकड वाहतुक करतांना त्या बाबतचे आवश्यक पुरावे न चुकता सोबत
ठेवण्यात यावे. तसे न झाल्यास आपणास त्रासास तोंड दयावे लागेल. पथकामार्फत कडक
तपासणी सुरु आहे. त्रास होवू नये म्हणून पुरावे सोबत ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment