बुलडाणा,
दि. 6 : मतदार यादीत नाव तपासणे व नाव नसल्यास नाव नोंदविणे यासाठी 9 मार्च 2014
रविवार रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व
मतदारांनी यादीत आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री किरण कुरुंदकर यांनी केले आहे.
बुलडाणा लोकसभा मतदार संघातील सर्व 1991 मतदान केंद्रांवर
केंद्रनिहाय कर्मचारी मतदार याद्यांसह उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थ तसेच
नागरिकांनी या दिवशी मतदार यादीत नाव तपासून घ्यावे तसेच जे युवा मतदार पात्र
झालेले आहेत परंतु त्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशा मतदारांनी या ठिकाणी अर्ज
नमुना क्र. 6 भरुन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असेही त्यांनी म्हटले आहे.
यंदा मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रथमच
अशा स्वरुपाचे शिबीर आयोजित केले आहे. याची सर्व राजकीय पक्ष आणि मतदारांनी नोंद
घ्यावी असे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी कळविले आहे.
----
माध्यम निवडणूक वृ.क्र.197/03
शहरातील
चौकांनी घेतला मोकळा श्वास
बुलडाणा, दि. 6 : आदर्श आचार
संहिता लागू होताच शहरातील व जिल्ह्यातील विविध पक्षांचे बॅनर आणि होर्डींग
हटविण्यास आज प्रारंभ झाला. यामुळे शहराच्या दर्शनी भागाचे मुळ स्वरुप लोकांसमोर
येत आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी या
संदर्भात काल पत्रकार परिषदेत निर्देश दिले होते या निर्देशांप्रमाणे उपविभागीय
अधिकाऱ्यांनी नागरपालिकांना सूचना केल्या आणि आज सकाळपासूनच होर्डींग हटविण्याच्या
मोहिमेला सुरुवात झाली.
बुलडाणा शहरातील गजबजलेल्या संगम चौक येथून होर्डींग हटविण्यास
प्रारंभ झाला. त्यानंतर क्रमाक्रमाने जयस्तंभ चौक नंतर कारंजा चौक, स्टेट बँक चौक
आदी ठिकाणचे होर्डींग हटविण्यात आले.
या मोहिमेत नगरपालिकेचे निलेश इंगळे, गणेश मुळे, सुनील बेन्डवाल,
राजेश भालेराव, गजानन बहरगे आदींनी सहभाग घेतला. या साठी शहर पोलिसांतर्फे
बन्दोबस्त देखील देण्यात आला होता.
----
No comments:
Post a Comment