Saturday, 15 March 2014

बुलडाणा माध्यम कक्षाचे उदघाटन


      बुलडाणा, दि.15 : माध्यमजगतला सर्व प्रकारची मदत आणि सुविधा आजपासून निवडणूक संपेपर्यंत मिळतील अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा 05-बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी केले.     निवडणूकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते झाले. नियोजन विभागाच्या नुतन इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, माध्यम कक्ष प्रमुख जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान सावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.     या केंद्राच्या माध्यमातून पत्रकारांसाठी फॅक्स, इन्टरनेट तसेच इतर सुविधा देण्यात येणार आहेत. या ठिकाणी पत्रकारांच्या दैनंदिन बातम्यांच्या कामकाजासह पेडन्यूज संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीचेही कामकाज चालणार आहे.
    
पत्रकार परिषदेतील छायाचित्र
यावेळी दै. देशोन्नतीचे प्रतिनिधी राजेंद्र काळे, चंद्रभूषण मुंगे, झि 24 चे संतोष लोखंडे, संजय जाधव, दिव्यमराठीचे प्रतिनिधी निलेश जोशी, तसेच वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी, दूरसंचार विभागाचे जनरल व्यवस्थापक एस.एस.राजोरीया, ज्युनिअर टेलिकॉम ऑफीसर खिल्लारे, दूरध्वनी तंत्रज्ञ आर.व्ही. हातोले तसेच जिल्‍हा माहिती कार्यालयातील प्र. माहिती सहाय्यक प्रकाश माळोदे, दिलीप काळे, विकास कुळकर्णी, राम पाटील, विलास जाधव, रमेश सापटे, आदी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment