Thursday, 13 March 2014

लोकसभा निवडणूक-2014 इच्छूक उमेदवारांसाठी सूचना

बुलडाणा, दि 13:  5-बुलडाणा लोकसभा मतदार संघामध्ये नामनिर्देशनपत्र भरु इच्छणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशनापूर्वी निवडणूक प्रयोजनार्थ स्वतंत्र बँक खाते उघडवायाचे आहे. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या वेळी निवडणूक खर्च व्यवहारासाठी काढण्यात आलेल्या बँकेचे पासबुक व पासबुकाची प्रत सोबत आणावी. तसेच उमेदवाराचे सोशल मिडिया जसे Wikpedia, Twitter, You tube, Face book, Apps यावर खाते उघडलेले असल्यास त्याबाबतची माहितीदेखील सोबत आणावी.
     निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चॅनलवर कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिध्द करावयाची असल्यास त्याबाबतची जिल्हा स्तरावरील जिल्हास्तरीय समितीची पूर्वमान्यता घेण्यात यावी असे किरण कुरुंदकर निवडणूक निर्णय अधिकारी, 5-बुलडाणा लोकसभा मतदार संघ बुलडाणा यांनी कळविले आहे.

मेहकर नगर परिषद हद्दीतीलबॅनर्स होर्डींग काढली
     बुलडाणा, दि. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 संपन्न होत आहे. आचारसंहिता कालावधीमध्ये राजकीय पक्षांची बॅनर्स,होर्डींग घोषणा या बाबत मेहकर नगरपरिषद हद्दीतील बॅनर्स व होर्डींग काढून घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी नगर परिषद मेहकर यांनी तसा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मेहकर यांना कळविले आहे.

लोणार नगर परिषद हद्दीतील बॅनर्स होर्डींग काढली

     बुलडाणा, दि. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 संपन्न होत आहे. आचारसंहिता कालावधीमध्ये राजकीय पक्षांची बॅनर्स,होर्डींग घोषणा या बाबत लोणार नगरपरिषद हद्दीतील बॅनर्स व होर्डींग काढून घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी नगर परिषद लोणार यांनी तसा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मेहकर  यांना कळविले आहे.

No comments:

Post a Comment