|
बुलडाणा, दि. 20 : निवडणूक
कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सर्व कर्मचाऱ्यांना समजेल अशा
पध्दतीने दृकश्राव्य माध्यमांचा वापर करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिले.
|
जिल्ह्यात होणार असलेल्या या प्रशिक्षणात 3 सत्रांच्या माध्यमातून
निवडणूक कर्मचाऱ्यांना या कामाची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सहायक
निवडणूक निर्णय अधिकारी व संबधित कर्मचाऱ्यांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात एका
बैठकीत घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
05 बुलडाणा लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा
संघाचा समावेश नसला तरी निवडणूक कामकाज मात्र जिल्हा हे एकक ठरवून करण्यात येत
असल्याने या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामधील कर्मचाऱ्यांचा
समावेश करण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान यंत्र हाताळणी पध्दत तसेच
मतदान आणि मतमोजणी संदर्भात विविध प्रकारच्या फिल्म्स् तयार करण्यात आलेल्या आहेत
त्यांचा वापर करण्यासोबतच पॉवर सादरीकरणाच्या माध्यमातूनही यात प्रशिक्षण दिले
जावे असे दृकश्राव्य प्रशिक्षण प्रभावी ठरते असे जिल्हाधिकारी म्हणाले.
या प्रशिक्षणात केंद्र प्रमुख तसेच केंद्रावरील इतर कर्मचारी
असतील. त्यांना मतदान प्रक्रिया तसेच इलेक्टॉनिक मतदान यंत्रांचा वापर व हाताळणी
तसेच स्वत:च्या मतदानासाठीची प्रक्रिया आदींची माहिती दिली जाणार आहे. यंदा
मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोणातून करण्यात आलेल्या प्रयत्नांबाबतही
त्यांना अवगत करण्यात येणार आहे.
****
.jpg)
No comments:
Post a Comment