Monday, 24 March 2014

निवडणूक आयोगाचे निरिक्षक चक्रवर्ती मोहन यांचे आगमन

निवडणूक निरिक्षकांनी आज माध्यम कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली. 

बुलडाणा, दि. 24 : भारत निवडणूक आयोगाचे निरिक्षक चक्रवर्ती मोहन यांचे मतदारसंघात 22 मार्च रोजी आगमन झाले. त्यांनी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर व पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्या समवेत बैठक घेऊन निवडणूक कामकाज तसेच कायदा व सुव्यवस्था स्थिती यांचा आढावा घेतला.

निरिक्षक मोहन हे दैनंदिन स्वरुपात दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. निवडणूक विषयक काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्यांना वैयक्तीकरित्या मांडता येतील. निरिक्षक मोहन यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 9552041303 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

No comments:

Post a Comment