जिल्ह्यात
होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थास्थिती अबाधित राखण्यासाठी
व गुन्हेगारावर वचक राहण्यासाठी संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात आंतरराज्य सिमा आणि
आंतरजिल्हा सिमा सिल करुन गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन चालवले
असुन पथसंचलन सुरु असुन दारु, जुगार तसेच अवैध शस्त्राबाबत तपासणी सुरु आहे.
त्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार आदर्श आचारसंहिता अवैद्य दारु
विक्रीच्या 193 केसेस मध्ये 200 इसमांना अटक करुन 226887/- रु. माल जप्त करण्यात
आला आहे. तसेच जुगार कायद्यान्वये 44 केसेसमध्ये 108 इसमांना अटक करुन 54535/- रु.
जप्त करण्यात आले आहे. सी.आर.पी.सी. कलमान्वये 1893 व मुंबई पोलीस कायद्यान्वये
121 प्रतिबंधक केसेस करण्याचे प्रस्तावित असुन आचासंहिता लागू झाल्यापासून
आजपावेतो CRPC
कलमान्वये 1352 व मुंबई पोलीस कायद्यान्वये
256 इसमाविरुध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सन 2009 मधील लोकसभा
निवडणूक, विधानसभा निवडणूक तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर
पालिका निवडणूकीत दाखल झालेल्या गुन्ह्यातील 252 इसमाविरुध्द सुध्दा कारवाई
करण्यात येत आहे.
निवडणूकीत
मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर रोखण्यासाठी सात विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 3
असे 20 फ्लाईंग स्कॉड ची नियुक्ती करण्यात आली असून त्यात प्रत्येकी एक पोलिस
अधिकारी व महसुलचे अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहे. तसेच प्रत्येकी पोलिस
ठाणे येथे पथक तयार करुन व्हिडीओ कॅमेरे देवून आदर्श आचार संहितेचा भंग होणार
नाही, संशयीत ठिकाणी व्हिडोओ चित्रीकरण करण्यात येत असून यापुर्वी ज्या ठिकाणी
पैशाचे व्यवहार झाले त्या विशेष भागात निवडणूकी दरम्यान पैशाचे वाटप होणार नाही
याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात
येणाऱ्या आंतरराज्य सिमा 02 आणि आंतरजिल्हा सिमा 012 असे एकूण 14 नाके उभारण्यात
आले असून त्यामध्ये 02 पोलीस अधिकारी व 116 पोलीस कर्मचारी लावण्यात आले आहेत. सदर
नाकाबंदी दरम्यान पोस्टे डोणगांव येथे दि. 20 मार्च 2014 रोजी गुटखा एकूण 3200
पाकीट व वाहनासह किंमत 257000/- रु. चा माल तसेच पो.स्टे. देऊळगांव राजा दि. 21
मार्च 2014 रोजी गुटखा एकूण 284 पुड्या किंमत 56800/- रु. चा माल पकडण्यात आला आहे
व पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे दि. 21 मार्च 2014 रोजी काशिराम सावळाराम जाधव,
रा. शिवाजी नगर, मलकापूर यांची अवैध शस्त्राबाबत घर झडती घेतली असता घराचे मागचे
खोलीमध्ये एक लोखंडी तलवार लांबी 32 इंच साडेचार इंच मुठ असलेली घरात अवैधरित्या
मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन चिखली शहरात पेट्रोलींग व
चेकींग करीत असताना इसम नामे 1) सौरव गोविंद थोरात रा. बोरी ता. जिंतूर जि. परभणी 2) स्वप्नील सुनिल चौधरी रा. नशिराबाद ह. मु.
जळगांव खां. एका आरोपीच्या कमरेला एअर पिस्टल आढळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.
मद्य
तस्करी व निवडणूक काळात मद्याचा वापर रोखण्यासाठी 20 फ्लाईंग स्कॉड व स्थानिक
गुन्हे शाखेतील 2 पथक तसेच आंतर राज्य सिमा व आंतर जिल्हा सिमा वरील 14 नाके व
राज्य उत्पादन शुल्क यांचे मदतीने उपाययोजना आखण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता
काळात दारु विक्री करणाऱ्या व जुगार खेळणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष मोहिम
राबविण्यात येत आहे तसेच दारु वाहतूक करणाऱ्याविरुध्द वाहतूक शाखेकडून सुध्दा
विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध दारु
विक्रीच्या 193 केसेसमध्ये 200 इसमांना अटक करुन 226887/- रु. माल जप्त करण्यात
आला तसेच जुगार कायद्यान्वये 44 केसेसमध्ये 108 इसमांना अटक करुन 54553/- रु. जप्त
करण्यात आले आहे.
या निवडणूकीत जिल्ह्यातील 1
पोलीस अधिक्षक, 2 अप्पर पोलीस अधिक्षक, 6 पोलीस उप अधिक्षक, 26 पोलीस निरीक्षक, 37
सहाय्यक पोलीस निरीक्षक, 62 पोलीस उप निरीक्षक, 2294 पोलीस कर्मचारी बंदोबस्त कामी
लागणार असून लोकसभा निवडणूक बंदोबस्त कामी बाहेरुन 2 पोलीस उप अधिक्षक, 6 पोलीस
निरीक्षक (C.I.D.),
85 प्रो. पोउपनि, 1 पोलीस उप निरीक्षक (रेल्वे), 100 पोलीस कर्मचारी (रेल्वे), 450
RPC (पीटीएस
जालना), 150 महिला RPC (पीटीएस खंडाळा), 1000 पुरुष होमगार्ड, 200
महिला होमगार्ड याप्रमाणे एकूण 2 Dy.S.P., 6 P. I. , 86 PSI, 550 कर्मचारी,
150 महिला कर्मचारी व 02 कंपनी SRPF हे निवडणूक बंदोबस्त कामी येणार आहेत तसेच RPF ची
एक कंपनी बंदोबस्त कामी जिल्ह्यात दि. 19 मार्च 2014 रोजी पासून तैनात करण्यात
आलेली आहे. सद्या बुलडाणा पोलीस दलात एकूण 229 लहान मोठे
वाहने असून बंदोबस्त कामी 156 अतिरिक्त वाहनांची आवश्यकता भासणार असून त्यासाठी
जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. असे एकूण 385 वाहनांचा
वापर सेक्टर पेट्रोलींग, झोन पेट्रोलींग, राखीव बंदोबस्त यांच्यासाठी करण्यात
येणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी व इंटरनेटचा गैरवापर रोखण्यासाठी स्थानिक
गुन्हे शाखा 2 स्कॉड नेमण्यात आले असून तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन
अधिकाऱ्यांना खास स्कॉड नेमण्याबाबत आदेश दिले असून जिल्ह्यातील इंटरनेट कॅफेवर
बारकाईने लक्ष ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. बुलडाणा
जिल्ह्यात अतिसंवेदनशील 2 बुथ असून संवेदनशील 108 बुथ व क्रिटीकल 9 बुथ आहेत. जाती
सलोखा राखून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील, पोलीस मित्र मंडळ,
शांतता समिती, मोहल्ला समिती तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य यांच्या मिटींग
घेण्यात आल्या आहेत तसेच या काळात जाती सलोखा बिघडविण्याच्या घटना घडणार नाही.
पुतळा संरक्षण समिती यांना जबाबदारीने सतर्क राहण्याबाबत सुचना देण्यात आल्या असून
जिल्ह्यात गुड मॉर्निंग स्कॉड नेमण्यात आले आहे. जिल्ह्यातील
सर्व पोलीस कर्मचारी यांचे निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठीचा अर्ज भरुन घेण्याचे
काम सुरु आहे. त्याप्रमाणे त्यांना जेथे निवडणूक बंदोबस्त असेल तेथे त्यांना मतदान
करणे शक्य होईल व जे अधिकारी/कर्मचारी जिल्ह्याबाहेर मतदान करणारे असतील त्यांचे
पोस्टल मतपत्रिका जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नांवे अर्ज भरुन घेण्याचे
काम सुरु आहे तसेच जे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या मूळ मतदार संघात बंदोबस्त कामी
नसले तरीही ते ज्या ठिकाणी बंदोबस्तात असतील त्या ठिकाणी सुध्दा ते आपल्या
मतदानाचा उपयोग करु शकतील कारण लोकसभा मतदार संघ हे एकच आहे. पोलीस उपअधिक्षक
(मुख्या.) बुलडाणा यांना नोडल ऑफीसर म्हणून नेमण्यात आले असून पोस्टल मतपत्रिकांची
प्रक्रिया ते पूर्ण करीत आहेत.
.jpg)
No comments:
Post a Comment