बुलडाणा, दि. 20 : शनिवार दिनांक 22 मार्च रोजी पारक्रम्य अधिनियम अ नुसार सुटी नाही. या दिवशी निवडणूक प्रक्रियेचा महत्वाचा टप्पा असल्याने आणि शासकीय कार्यालयांना लेखाविषयक कामकाज असल्याने शनिवारी 22 मार्च 2014 रोजी शासकीय सुट्टी असणार नाही. या दिवशी सर्व शासकीय कार्यालये सुरु असणार आहेत. लोकसभा निवडणूक नामनिर्देशन कालावधी असल्याने 22 मार्च 2014 रोजी विहीत वेळेपर्यंत म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील असे 05 बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment