Monday, 24 March 2014

21 उमेदवारांचे अर्ज वैध



                बुलडाणा, दि. 24 : लोकसभा निवडणुक 2014 वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांच्या अर्जाची छाननी आज जिल्हाधिकारी यांचे कक्षात 05 बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी केली. यावेळी सहाय्‍यक निवडणुक निर्णय अधिकारी एस.ए. खांदे तसेच उमेदवार व सुचक उपस्थित होते.
            छाननीमध्ये वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवार खालील प्रमाणे आहेत.
            राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार अ. अफिस अ. अजीज पक्ष बहुजन समाज पार्टी, इंगळे कृष्णराव गणपतराव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, जाधव प्रतापराव गणपतराव शिवसेना.
नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षाचे तथा अन्य उमेदवार गवई परमेश्वर हिरामन आंबेडकरिस्ट रिपब्लीकन पार्टी, पवार रविंद्रसिंग रामसिंग लोकभारती, श्रीमती प्रभाताई मधुकर पार्लेवार नारायणीसेना, ॲड. रविंद्र ज्ञानदेव भोजने आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, वसंतराव सुखदेव दांडगे समाजवादी पार्टी, सुर्वे सुधीर बबन आमआदमी पार्टी, संदेश अशोक आंबेडकर बहुजनमुक्ती पार्टी, अयाद अहमद हबीब अहमद अपक्ष, अशोक राजाराम राऊत अपक्ष, अंभोरे प्रदिप एकनाथ अपक्ष, कृष्णा साहादू इंगळे अपक्ष, चिंचोले गंगाराम काळुजी अपक्ष, जाधव समाधान त्र्यंबक अपक्ष, दराडे बालासाहेब शंकर अपक्ष, नामदेव पुंडलीक डोंगरदिवे अपक्ष, भास्करराव रामराव मोरे अपक्ष, संजय महादेव वानखडे अपक्ष, संबारे दिनकर तुकाराम अपक्ष ह्या 21 उमेदवारांची अर्ज वैध ठरले आहेत. उर्वरित 5 अर्ज छाननीमध्ये बाद झाली आहेत.

छाननीच्या वेळी उमेदवार, सुचक धिरज लिंगाडे, समाधान जाधव, परमेश्वर गवई, अ.अफिज अ. अजीज, प्रशांत ठाकरे, भगवान अवसरमोल, डॉ. अब्दुल जावेद, ॲड. अमोल बल्लाळ, बाळासाहेब दराडे, अशोक राउत, वसंतराव दांडगे, नामदेवराव डोंगरदिवे आदी उमेदवार तथा सुचक उपस्थित होते.
5 अर्ज अवैध


                बुलडाणा, दि. 24 : 05 बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीत 5 अर्ज अवैध ठरले त्यांची नावे अशी प्रताप पंढरीनाथ पाटील, अ. जावेद अ. वहाब, वाकेकर स्वाती संदीप, अ. अजीज अ. सत्तार आणि तायडे विलास शंकर

No comments:

Post a Comment