बुलडाणा, दि. 19 : 05-बुलडाणा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकी
दरम्यान अवैध दारु विक्री व वाहतुकीला कठोरपणे आळा घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिले होते.
लोकसभा निवडणूक काळात अवैध दारु विक्रीवर वचक बसण्यासाठी 15 मार्च
रोजी चिखली-जाफ्राबादरोडवर अवैध दारु
वाहतुक होते अशी माहिती मिळाल्याने सांजुळ बस थांब्याजवळ हिरोहोंडा डॉन एम
एच-21-जी-3343 मोटर सायकल पिशवीमध्ये देशी दारु टँगो प्रिमियम या ब्राँडचा 180
मि.ली.च्या 144 बाटल्या मिळून आल्यात मुदेमाल व मोटार सायकल रु. 37250 त्यांचे
मुल्य असून आरोपी इसम हनुमान महादु आवसोर रा. वरुड, भास्कर सिताराम पोपळवर रा.
वरुड यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरील कारवाईसाठी प्र. निरिक्षक
विलास ग.पाटील, जी.एन.सोनकांबळे स.दु.नि. यांनी सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment