Saturday, 15 March 2014

लोकसभा निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज-किरण कुरुंदकर


   05-बुलडाणा लोकसभा मतदार संघातील निवडणूक पहिल्या टप्प्यात 10 एप्रिल 2014 रोजी होत आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्याशी  संवाद साधला.
प्रश्न : या निवडणूकीची लोकसभा मतदार संघातील मतदारसंख्या आणि व्याप्ती याबाबत आपण काय सांगाल
उत्तर : 05-बुलडाणा लोकसभासंघात जिल्ह्यातील आठ पैकी 7 विधानसभा मतदारसंघ आहेत यात
         22-बुलडाणा, 23- चिखली, 24-सिंदखेडराजा, 25-मेहकर, 26-खामगाव आणि 27-जळगाव
         जामोद हे ते सात मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात असणारा 21 मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ
         लगतच्या रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला आहे.
         जिल्ह्यात 1 जानेवारी 2014 दिनांकानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांची संख्या
         15 लाख 68 हजार 594 इतकी होती यात पुरुष मतदारांची सख्या 8 लाख 31 हजार 141 तर
         स्त्री मतदारांची सं,या 7 लाख 37 हजार 453 होती.
         निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 9 मार्च 2014 रोजी नाव नोंदणी  राहून गेलेल्या
         मतदारांना पुन्हा संधी देण्याच्या दृष्टीकोणातून विशेष मतदार नोंदणी शिबीरे जिल्ह्यात घेण्यात 
         आली त्यामध्ये 23 हजार 564 मतदारांनी नावे नोंदविली आहेत. यात उल्लेखनीय बाब म्हणजे
         2 हजार 876 उमेदवार हे 18 ते 19 वर्षांचे युवा मतदार आहेत.
प्रश्न : जिल्ह्यात मतदान केंद किती आहेत. यंदा वाढलेली मतदार संख्या लक्षात घेऊन काही बदल
           करण्यात आले आहेत का ?
उत्तर : जिल्ह्यात मतदारसंख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे यंदा 80 मतदान केंद्र वाढली
         आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणूकीत मतदान केंद्रांची संख्या 1911 इतकी होती आता ही
         संख्या 1991 इतकी झाली आहे ही संख्या जिल्ह्याची आहे. या 1991 केंद्रांपैकी 273 मतदान
        केंद्रे रावेर मतदार संघात आहेत बुलडाणा लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय केंद्रांची संख्या बुलडाणा 275, चिखली
        272, सिंदखेडराजा 314, मेहकर 296, खामगाव 291 आणि जळगाव जामोद 270 अशी
         एकूण 1718आहे.
प्रश्न : मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्ह्यात काय उपाय योजना आपण केल्या ?  त्याला प्रतिसाद
         कसा मिळाला.
उत्तर : भारत निवडणूक आयोग मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सातत्याने मतदार जागृती करीत आहे
          याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये Systemafic voters and Electoral Parficipation  अर्थात स्वीप 
          प्लॉन राबविण्यात आला. युवा महोत्सवाच्या माध्यमातून उपक्रम घेणे तसेच महाविद्यालय
          स्तरावर अँबॅसिडर नियुक्त करुन युवकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याचा संदेश देण्यात
          आला आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना संकल्पपत्र पाठवून
          त्यांच्याकडून आम्ही मतदान करणारच असा संकल्प घेण्यात येत आहे. या स्वरुपाची 13 लाख
         संकल्पपत्रे भरुन घेण्याचे काम वेगात सुरु आहे. या माध्यमातून साधारण 30 ते 35 टक्के     
         मतदान वाढावे असा प्रयत्न प्रशासन करीत आहे. यंदा नवमतदारांचा असणत उत्साह आणि 
         टिव्ही तसेच सोशल नेटवर्कींग मधून होणाऱ्या जागृती मुळे यंदा प्रमाण अधिकच राहणर आहे.
प्रश्न : ज्या यंत्रणेच्या माध्यमातून निवडणूक घेतली जाते अशा शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि
         पोलिसांचेचे मतदान राहून जाते. त्याबाबत काय नियोजन करण्यात आले आहे.
उत्तर : जिल्ह्यात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान करणे  सक्तीचे करण्यात आले
         आहे. कर्मचारी हा लोकसभा मतदार संघ एक घटक असल्याने त्याला त्याची केंद्रावर मतदान
         करणे शक्य आहे.  Election Duty Certificate अर्थात निवडणूक कार्यावर आहे असे प्रमाणपत्र
         त्याच्या नावे दिले जाऊ शकते. अशा सर्वांनी आपले मतदान नेमके यादी कोणत्या क्रमांकावर
         आहे. त्याचा मतदार क्रमांक तसेच घरक्रमांक आदींचा उल्लेख असणारे हे प्रमाणपत्र दाखवून
          त्याला नियुक्ती असणाऱ्या ठिकाणीच बटण दाबून मतदान करता येणार आहे. एकही कर्मचारी
          मतदानापासून वंचित राहू नये या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वांचे सहकार्य
          महत्वाचे ठरणार आहे.
प्रश्न : निवडणूकीचे नेमके वेगळेपण काय असणार आहे.
उत्तर : यंदा राज्यात प्रथमच नोटा अर्थात NON OF THE ABOVE अर्थात या पैकी कुणीही नाही
         असे बटण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर असणार आहे.
         उमेदवार नाकारण्याचा अधिकार देणरा हा बदल हे या निवडणूकीचे वेगळेपण आहे त्यामुळे
         नकारार्थी मतदान शक्य आहे याच्या टक्केवारीवरुन लोकांचा खरा कल दिसेल व मतदानाचे
          प्रमाणही वाढेल.
शब्दांकन
           प्रशांत दैठणकर
       जिल्हा माहिती अधिकारी

               बुलडाणा

No comments:

Post a Comment