|
बुलडाणा,
दि. 19 : मतमोजणी होणार असलेल्या केंद्रास जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा
जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी आज भेट देवून पाहणी केली व केंद्र उभारणीचा
आराखडा व मतपेट्यांची सुरक्षा याबाबत चर्चा केली.
|
पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब ठेंग, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी रमेश घेवंदे, मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे तसेच जिल्हा माहिती
अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची या पाहणी दरम्यान उपस्थिती होती.
मलकापूर मार्गावर असलेल्या औद्योगिक
प्रशिक्षण केंद्रात मतपेट्या ठेवणे आणि प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी 15
कक्षामध्ये मतपेट्या ठेवल्या जातील त्या सर्व खोल्यांची सुरक्षेच्या दृष्टीकोणातून
दुरुस्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होणार
असलेल्या ठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघ निहाय करायची व्यवस्था तसेच निवडणूक कामकाज
कर्मचारी व्यवस्था सोबतच उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या येण्याजाण्याची व्यवस्था,
उपहारगृह तसेच वाहनतळ आदींची व्यवस्था कशी असेल याबाबतचा आराखडा यावेळी तपासण्यात
आला.
याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याच्या बाहेरील मोकळ्या मैदानाची सफाई
करुन तिथे त्यांना निकालाची घोषणा ऐकता यावी या स्वरुपाची व्यवस्था ठेवण्याचे
निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मतपेट्यांची सुरक्षा ठेवण्यासाठी
बन्दोबस्त कशा स्वरुपाची असावी व अधिकाधिक कडक बंदोबस्त ठेवणे तसेच मतमोजणीच्या
दिवसाची सुरक्षा व्यवस्था याबाबत पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्याशी
त्यांनी यावेळी चर्चा केली.

No comments:
Post a Comment