बुलडाणा, दि. 19 : सर्व राजकीय पक्षांनी
आपापल्या उमेदवारांचे हिशोब दैनंदिन स्वरुपात सादर करणे आवश्यक आहे. अशी माहिती 05
-बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण
कुरुंदकर यांनी दिली.
निवडणूक 2014 संदर्भात माहिती देण्यासाठी
राजकीय पक्षांच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात
आली त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, जिल्हा माहिती
अधिकारी प्रशांत दैठणकर तसेच राजकीय पक्षांचे जिल्हा प्रमुख यांची प्रमुख यांची
यावेळी उपस्थिती होती.
निवडणूक विषय कायदे त्यातील तरतुदी तसेच आचार
सहिंता, मतपेट्यांची व्यवस्था आणि मतपेट्यांचे रॅन्डमायझेशन याबाबत यावेळी
जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरण केले. राजकीय पक्षांनी खर्चाची माहिती
दैनंदिन स्वरुपात द्यायची आहे तसेच खर्च विषयक निरिक्षक 30 मार्च, 4 एप्रिल आणि 8
एप्रिल रोजी प्रत्यक्ष तपासणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर करतांना सादर
करावयाच्या कागदपत्रे व शपथपत्रांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. उमेदवारांनी
आपली मालमत्ता जाहिर करतांना आजच्या बाजारमुल्यासह शपथपत्र व माहिती सादर करावयाची
आहे. याबाबतच्या स्पष्ट सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पेड न्युजवर विशेष लक्ष दिले जाणार
आहे. त्याचवेळी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांवर दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींचे
प्रमाणीकरण करुन घेण्यासाठी यंदा वेगळी समिती करण्यात आली सर्व राजकीय पक्षांनी
आणि उमेदवारांनी आपल्या जाहिराती विहीत नमुन्यात दोन डीव्हीडीसह सादर करावयाच्या
आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:
Post a Comment