लोकसभा निवडणूक-2014 साठी
मतदारांना मतदान करण्यासाठी जास्त दुर जावे लागत होते. तसेच काही केंद्र गांवापासून
दूर असल्यामुळे मतदारांची अडचण लक्षात घेता त्यामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी 05-लोकसभा मतदारसंघ किरण कुरुंदकर
यांनी दिली.
मतदाराची अडचन लक्षात घेवून
25-मेहकर, 26-खामगांव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात केंद्राच्या इमारतींमध्ये बदल झाला
त्यास भारत निडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे.
25-मेहकर (अ.जा) विधानसभा मतदारसंघ
मतदान
केंद्र क्र.75-माळखेड
– माळखेड या केंद्राला यापुर्वी हिवरखेड व वर्दडा गावचे मतदार जोडण्यात आलेले होते.
परंतु माळखेड आणि हिवरखेड या गांवाच्या मध्ये पाझर तलाव तसेच शेततळे झाल्यामुळे सदर
गांवच्या मतदारांना मतदानासाठी येण्याकरीता 8 कि.मी. अंतर निर्माण झालेले आहे. त्यामुळे
हिवरखेड या गावासाठी मतदान केंद्र क्रमांक 75 हे हिवरखेड येथे स्थलांतरीत करण्याबाबत
मान्यता प्राप्त झालेली आहे. केंद्र क्रमांक 75-माळखेडमध्ये यापुर्वी असलेले वर्दडा
येथील मतदार हे मतदान केंद्र क्रमांक 76-माळखेड ला जोडण्यात आलेले आहे. कारण वर्दडा
हे गांव माळखेडला जवळ आहे.
215-पारडी
– यापुर्वी मतदान केंद्र क्र.
215-पारडी या मतदान केंद्राला बोराखेडी येथील मतदार संलग्न करण्यात आलेले होते. परंतु
पारडी व बोराखेडी या गावच्या मध्ये धरण झाल्यामुळे बोराखेडी येथील मतदारांना पारडी
येथे येण्यास 10 कि.मी. अंतर निर्माण झालेला आहे. त्यामुळे यापुर्वी पारडी येथे असलेले
मतदान केंद्र क्रमांक 215 हे बोराखेडी येथे स्थलांतरीत करण्याबाबत मान्यता प्राप्त
झालेली आहे. मतदान केंद्र क्रमांक 215 ला यापुर्वी जोडण्यात आलेले पारडी येथील मतदार
214 पारडी या मतदान केंद्राला संलग्न करण्यात आलेले आहे.
26-खामगांव विधानसभा मतदारसंघ
मतदान
केंद्र क्र.17-खोलखेड –
खोलखेड येथील जि.प.मराठी शाळेची इमारत पडल्यामुळे सदर मतदान केंद्र जि.प.मराठी शाळा
नविन इमारत खोली क्र.-1 खोलखेड मध्ये मान्यता प्राप्त झालेली आहे.
मतदान
केंद्र क्र.134,135 व 136-खामगांव – छत्रपती शिवाजी महाराज न.प. मराठी शाळा क्र.2 खामगांवची
इमारत पाडल्यामुळे त्याच शाळेच्या आवारात खालील ठिकाणी मतदान केंद्र मान्यता प्राप्त
झालेली आहेत. तसेच 134-खामगांव-नगर परिषद, आयुर्वेदिक दवाखाना खामगांव, 135-खामगांव-महाराष्ट्र
कामगार कल्याण केंद्र इमारत खामगांव, 136-खामगांव-छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद
मराठी शाळा नंबर-2 नविन इमारत खोली नं.1 खामगांव या ठिकाणी मान्यता प्राप्त झालेली
आहे.
याबदलाची नोंद मतदारांनी तसेच
उमेदवारांनी घ्यावी, असेही त्यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment