Sunday, 6 April 2014

मतदान केंद्रांच्या इमारतीमध्ये बदल - किरण कुरुंदकर



बुलडाणा : लोकसभा निवडणूक-2014 साठी मतदारांना मतदान करण्यासाठी जास्त दूर जावे लागत होते. तसेच काही केंद्र गावापासून दूर असल्यामुळे मतदारांची अडचण लक्षात घेता त्यामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा 05-लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली.

मतदारांची अडचण लक्षात घेऊन 25-मेहकर, 26-खामगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील केंद्राच्या इमारतींमध्ये बदल केला आहे. त्यास भारत निडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे.

25-मेहकर (अ.जा) विधानसभा मतदारसंघ

मतदान केंद्र क्र. 75- माळखेड – माळखेड या केंद्राला यापूर्वी हिवरखेड व वर्दडा गावचे मतदार जोडण्यात आलेले होते. परंतु माळखेड आणि हिवरखेड या गावांमध्ये पाझर तलाव तसेच शेततळे झाल्यामुळे सदर गावच्या मतदारांना मतदानासाठी येण्याकरिता 8 कि.मी. अंतर निर्माण झालेले आहे. त्यामुळे हिवरखेड या गावासाठी मतदान केंद्र क्रमांक 75 हे हिवरखेड येथे स्थलांतरित करण्याबाबत मान्यता प्राप्त झालेली आहे. केंद्र क्रमांक 75-माळखेडमध्ये यापूर्वी असलेले वर्दडा येथील मतदार हे मतदान केंद्र क्रमांक 76-माळखेडला जोडण्यात आलेले आहेत. कारण वर्दडा हे गाव माळखेडला जवळ आहे.

215-पारडी – यापूर्वी मतदान केंद्र क्र. 215-पारडी या मतदान केंद्राला बोराखेडी येथील मतदार संलग्न करण्यात आलेले होते. परंतु पारडी व बोराखेडी या गावामध्ये धरण झाल्यामुळे बोराखेडी येथील मतदारांना पारडी येथे येण्यास 10 कि.मी. अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे यापूर्वी पारडी येथे असलेले मतदान केंद्र क्रमांक 215 हे बोराखेडी येथे स्थलांतरित करण्याबाबत मान्यता प्राप्त झालेली आहे. मतदान केंद्र क्रमांक 215 ला यापूर्वी जोडण्यात आलेले पारडी येथील मतदार 214 पारडी या मतदान केंद्राला संलग्न करण्यात आलेले आहे.

26-खामगाव विधानसभा मतदारसंघ

मतदान केंद्र क्र. 17- खोलखेड – खोलखेड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत पडल्यामुळे सदर मतदान केंद्र जिल्हा परिषद मराठी शाळा नवीन इमारत खोली क्र.-1 खोलखेड मध्ये घेण्यास मान्यता प्राप्त झालेली आहे.

मतदान केंद्र क्र. 134, 135 व 136- खामगाव – छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद मराठी शाळा क्र.2 खामगावची इमारत पाडल्यामुळे त्याच शाळेच्या आवारात खालील ठिकाणी मतदान केंद्र घेण्यास मान्यता प्राप्त झालेली आहेत. तसेच 134-खामगाव- नगरपरिषद, आयुर्वेदिक दवाखाना खामगाव, 135-खामगाव-महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र इमारत खामगाव, 136-खामगाव-छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद मराठी शाळा नंबर-2 नवीन इमारत खोली नं. 1 खामगाव या ठिकाणीही मान्यता प्राप्त झालेली आहे.

No comments:

Post a Comment