लोकसभा सार्वत्रिक
निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाचा दिवस हा पुर्ण पगारी
सुटटीचा दिवस घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय
अधिकारी किरण कुरूंदकर यांनी दिली.
भारत निवडणुक आयोगाने
1951 च्या लोकप्रतिनिधीत्व कायदयाच्या कलम 135 ब अनुसार हा दिवस पगारी सुटटीचा असल्याचे
परिपत्रक जारी केले आहे.
कोणत्याही आस्थापनेखाली असणाया
मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सुटटी आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघात
10 एप्रिल 2014 रोजी व रावेर मतदारसंघातील मलकापुर विधानसभा क्षेत्रासाठी मतदानाच्या
दिवशी दिनांक 24 एप्रिल 2014 रोजी हि सुटटी असेल.
या कलमाच्या उपकलम 1 अन्वये
कोणत्याही प्रकारचे भत्ते वा वेतन यांची कपात होउु नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा प्रकारे एखादयाचे भत्ते वा वेतन यांची कपात करण्यात आली असेल तर मालकास 500 रुपये
दंड करण्याची तरतुद या कलमात आहे.
आस्थापना व दुकान कायदयानांही वरील बाबी लागु आहेत. जेथे पाळयांमध्ये काम होते अशा सर्व आस्थापना व कारखाने तसेच दुकाने मतदानाच्या दिवशी पूर्ण बंद ठेवण्याचे निर्देश यामध्ये आहेत.
एखादया कर्मचायाचे मतदान अन्य
लोकसभा मतदारसंघात असेल तर त्याला मतदानासाठी सुटटी देण्याचे बंधनही यात समाविष्ट आहे.
No comments:
Post a Comment