| बुलडाणा : आजचे विद्यार्थी हे उद्याचे मतदार आहेत. मतदान करावे असा संदेश विद्यार्थ्यांकरवी पालकांना देण्यासाठी आज मतदार जागृती अभियान रॅलीचे आयोजन जिजामात प्रेक्षागार येथून करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरीक रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये प्रथम स्थानी जागृती रथ होता. रॅलीत मतदान करा असा संदेश दिला गेला. मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता भारत निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून बुलडाणा शहरात, जिल्ह्यात, सर्व शहरांमध्ये व मोठ्या गावांमध्ये जनजागृतीचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. कुरुंदकर यांनी सांगितले. रॅलीमध्ये राजस्थानी युवा संस्थेचे अध्यक्ष ॲड. जितेंद्र कोठारी, सचिव अजय लाहोटी यांनी जागृत रथ तयार केला होता. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर रॅली संगम चौक-जयस्तंभ चौक-बाजार लाईन-महावीर चौक मार्गाने निघून रॅलीचे एडेड शाळेच्या प्रांगणात विसर्जण करण्यात आले. सदर रॅलीमध्ये जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते. सदर रॅलीमध्ये बुलडाण्यातील शिवाजी हायस्कूल, एडेड हायस्कूल, भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, शिंदे गुरुजी हायस्कूल, रुखाई कन्या शाळा, शारदा ज्ञानपीठ, अब्दुल हमीद हायस्कूल, मौलाना आझाद हायस्कूल, भगवान महावीर विद्यालय, सरस्वती विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, नॅशनल हायस्कूल इत्यादी शाळांचे 6500 विद्यार्थी उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी राजस्थानी युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने अध्यक्ष ॲड. जितेंद्र कोठारी, उपाध्यक्ष राजेंद्र मालू, कोषाध्यक्ष पंकज अग्रवाल, सचिव अजय लाहोटी, सहसचिव मनिष वर्मा व सदस्य डॉ. दिनेश अग्रवाल, अविनाश जैन, संजय तातेड, दिनेश छाजेड, विजय शर्मा, अजय अग्रवाल, अजय शर्मा, अनिल वर्मा यांनी परिश्रम घेतले. | |
Sunday, 6 April 2014
मतदान करण्याचा संदेश देणाऱ्या रॅलीला सुरुवात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment