महिलांचा
मतदानातील सहभाग वाढावा यासाठी आशा तसेच अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावागावात मोहिम
राबवावी आणि हे प्रमाण वाढेल याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणुक निर्णय अधिकारी किरण कुरूंदकर यांनी केले.
महिलांचा मतदानात असणारा सहभाग जिल्हयात कमी आहे. 2009 च्या
लोकसभा निवडणुकीत स्त्री मतदानाचे प्रमाण पुरुष मतदानाच्या तुलनेत दहा टक्क्याहुनही
अधिक प्रमाणात कमी झालेले होते. याच्या कारणांचा तपास करुन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या
सुचना त्यांनी दिल्या.
या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या कक्षात एका विशेष बैठकीत
ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी (महिला व बालकल्याण) क-हाळे प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा
अनुप शेंगुलकर , उपजिल्हा निवडणुक अधिकारी रमेश घेवंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत
दैठणकर तसेच आरोग्य विभागाच्या अधिकायांची या बैठकीस उपस्थिती होती.
महिलांना याबाबत सातत्याने गावात बैठका घेवून आशा व अंगणवाडीताई
यांच्या मदतीने मतदानासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. त्याचसोबत सक्रिय महिला मंडळे
आणि महिला बचत गट तसेच माविमच्या माध्यमातून महिला मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे
गरजेचे असल्याचे किरण कुरूंदकर म्हणाले.
मतदार
जागृतीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
05-लोकसभा मतदारसंघ किरण कुरुंदकर यांनी मतदारांना लिहिलेले अनौपचारिक छापिल पत्र आज
वृत्तपत्रांमधून घराघरात पोहचले आहे. याच्या धर्तीवर महिला मतदारांना आवाहन करणारे
जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र पाठविण्यात यावे
असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
वृत्तपत्रे तसेच केबल वाहिन्या आणि इतर माध्यमातून
मतदार जागृतीचे उपक्रम सुरु आहेत त्यातही महिला मतदारांना प्रो-साहित करुन त्यांना
मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विशेष प्रयत्न येत काळात करण्याच्या सूचना कुरुंदकर
यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment