Saturday, 5 April 2014

मतदानयंत्रे मतदारसंघात पाठविण्याचे काम पूर्ण - किरण कुरुंदकर



बुलडाणा : लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान यंत्रे तयार करणे आणि त्या सिलबंद करुन त्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयास पाठवण्याचे कामकाज आज पार पडले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली.

येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन सभागृहात हे कामकाज सकाळी निवडणूक निरीक्षक मोहन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश घेवंदे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मतपेट्या सभागृहात आणण्यात आल्या. त्यांनतर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पेट्यांचे सिल काढण्यात आले. यात निवडणूक नियमावलीनुसार मतदार याद्या व उमेदवारांचे चिन्ह असणाऱ्या मतमत्रिका भरण्यात येवून मतदानयंत्रे सिल करण्याचे कामकाज सुरु झाले.

यंदा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याबरोरबच वरीलपैकी एकही नाही असे ‘नोटा’ नकाराधिकार असणारे बटनही या मतपत्रिकेत आहे. उमेदवारांची संख्या वाढली असल्याने यावेळी दोन मतदान यंत्रे लागणार आहेत, त्याची माहिती सर्वांना देण्यात आली.

No comments:

Post a Comment