| बुलडाणा : अतिशय उत्तम अशी आकडेवारी व माहिती असलेली निवडणूक पूर्वपीठिका पत्रकार, अभ्यासक तसेच संशोधक यांना उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी केले. लोकसभा निवडणूक-2014 पूर्वपीठिका पुस्तिकेचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी तथा 05-लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांचे हस्ते झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुऱ्हाळे, प्र. माहिती सहाय्यक प्रकाश माळोदे आदी उपस्थित होते. पत्रकारांना व नागरिकांना मागील निवडणुकीची आकडेवारी सहज उपलब्ध व्हावी यादृष्टीने ही पूर्वपीठिका उपयुक्त आहे. तसेच ती पुस्तिका संग्रही ठेवण्यालायक असून राजकीय चित्र स्पष्ट करणारी आहे, असे कौतुकही श्री. कुरुंदकर यांनी केले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील आवश्यक मतदान कर्मचारी, पोलिंग स्टेशनची माहिती, लोकसभा निवडणूक 1991, मतदान लोकसभा निवडणूक 1996, लोकसभा निवडणूक 1998, लोकसभा निवडणूक 1999, लोकसभा निवडणूक 2004 आणि लोकसभा निवडणूक 2009 यांच्या तपशिलासह उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – किरण कुरुंदकर, बुलडाणा कायदा व सुव्यस्था मजबूत – जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर यांची मुलाखत असून राजकीय पक्षांनी काय करावे व काय करु नये याबाबत मार्गदर्शक तत्त्वे, पत्रकांची यादी, मतदार जागृती कार्यक्रम अशा विविध माहितीचा समावेश त्यात असल्याचे श्री.त दैठणकर यांनी सांगितले. यावेळी दूरदर्शनचे प्रतिनिधी युवराज वाघ, ABP माझाचे संदीप शुक्ला तसेच तरुण भारताचे मुकूंद जोशी आदींची उपस्थिती होती | ||
Saturday, 5 April 2014
संग्राह्य अशी निवडणूक पूर्वपीठिका - किरण कुरुंदकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment